
कोकणामध्ये पावसाने थैमान घातले असून नद्या दुथडी भरून वाहु लागल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहेत. मंडणगड तालुक्यात सुद्धा पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे मंडणगड पालघर या गावातून वाहणाऱ्या भारजा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या भारजा नदीच्या पूरात पालघर येथील रहिवासी वाहून गेल्याची घटना घडली.
गेल्या काही दिवसांपासून मंडणगड तालु्क्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पानथळ ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मंडणगड पालघर या गावातून वाहणाऱ्या भारजा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भारजा नदीच्या पूरात पालघर येथील रहिवासी दीपक तांबुटकर हे वाहून गेले. मात्र त्यांना झाडाच्या फांदीचा सहारा मिळाल आणि त्यांनी शेवटपर्यंत झाड काही सोडले नाही. झाडाला घट्ट मिठी मारून ते पूराच्या पाण्यात मदतीसाठी उभे होते. त्याचवेळी ग्रामस्थांनी त्यांना पाहिले आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अखेर ग्रामस्थांनी आणि मंडणगड रेस्क्यू टीमने एकत्रीत प्रयत्न करत मोठ्या वेठणाचा आणि होडीचा वापर करत दीपक तांबुटकर यांना पूराच्या पाण्यातून बाहेर काढले.