यूटय़ूबने बदलले व्हिडीओचे नियम

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) बनवणारे व्हिडीओ कंटेटसंबंधी टेक कंपन्या नवीन नियम आणत आहेत. आता एआय व्हिडीओजसाठी यूटय़ूबने आपल्या गाईडलाईनमध्ये बदल केले आहेत. यूटय़ूबने एआय जनरेटेड कंटेटवरून नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाईन्सनुसार, कंटेट क्रिएटर्सला आता सांगावे लागणार की, त्यांनी जो व्हिडीओ अपलोड केला आहे, तो एआयने बनवला आहे की नाही. एआय असलेले व्हिडीओ हटवण्याचे निर्देशही युजर्सला यूटय़ूबवरून दिले जाऊ शकतात.