महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला आंदण देणारे पुन्हा सत्तेत दिसायला नको, आदित्य ठाकरे कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाडमध्ये जंगी सभा घेतली. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत आदित्य ठाकरे यांनी आता राज्यात मशाल पेटवण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवण्यासाठी जनतेने मशाल चिन्ह लक्षात ठेवावे, असे आवाहन केले. तसेच राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याबाबत त्यांनी उद्योगमंत्र्यांवर चांगलेच आसूड ओढले. महाडमध्ये स्नेहल जगताप यांच्या प्रचारासाठी ते आले होते.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर आमचे प्राधान्य उद्योगालाच असेल. रोजगार, रोजगार, रोजगार हा राज्यासाठी महत्त्वाचा आहे. आताचे उद्योगमंत्री त्यांचे नाव काय ते माहित नाही आणि त्यांचे उद्योग काय ते पण मला माहित नाही. सुभाष देसाई आपल्या राज्याचे सात आठ वर्षे उद्योगमंत्री राहिलेले आहेत. त्यांना माहित आहे की या राज्यासाठी उद्योग किती महत्वाचा आहे. जरी आताचे उद्योगमंत्री त्यांचे नाव काय ते माहित नाही आणि त्यांचे उद्योग काय ते पण मला माहित नाही. डांबर काय? अहो पण रस्त्यातून गायब झाले डांबर. कुठे गेले? म्हणजे रस्त्यातून डांबर गायब झाले, राज्यातून उद्योग गायब झाले आणि स्वत:ला उद्योगमंत्री म्हणवतात असे आपल्याला डोक्यावर बसवलेले आहेत असा सणसणीत टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

ही लढाई एका आमदाराची नाही, फक्त ही निवडणुकीसाठी महत्वाची नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आहे. कारण महाडमध्ये आपल्याला परिवर्तन घडवायला लागणार म्हणजे लागणारच. आम्ही महाडकडे फक्त मतदारसंघ म्हणून पाहत नाही. रोजगाराचा पाया रचण्याचे शरग म्हणून महाडकडे आपण पाहतो. या महाराष्ट्रात जे मी स्वप्न घेऊन पुढे चाललो आहे आणि मी जे काही सांगितलेले आहे. आपलं सरकार आल्यानंतर आपल्या तीन प्रायोरिटी राहणार आहेत. पहिलं उद्दीष्ट्य रोजगार निर्मिती, दुसरं म्हणजे रोजगार निर्मिती आणि तिसरं म्हणजे रोजगार निर्मिती आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला पहिल्या तीन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे रोजगार, रोजगार आणि रोजगार . त्याची सुरुवात महाडमधून होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, काय छवी झाली आपल्या मंत्र्यांची. एकेकाळी कुठच्याही पक्षातला मंत्री असो एक रुबाब वाटायचा., मंत्री आला आहे, लाल दिवा आला आहे. गावात कोणी आले की वाटायचे याला सलाम ठोकला पाहिजे पण आता असे वाटते यालाच ठोकले पाहिजे. ही महाराष्ट्राची परिस्थिती बघवत नाही आणि सुभाष देसाई जेव्हा उद्योगमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावेळीही मन लावून काम केले होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती देखील मुख्यमंत्री असताना साडेसहा लाखकोटींची गुंतकवणुक आपण आपल्या राज्यात आणू शकलो हे आपले काम होते. जे उद्योग आपण आपल्या राज्यात आणले ते उद्योग गेले कुठे? जे घटनाबाह्य मुख्यमंत्री, अवकाळी मुख्यमंत्री जे डोक्यावर बसले आहेत त्यांना चॅलेंज केले होते. माझ्यासमोर येऊन आणलेल्या उद्योगांबाबत सांगा. चॅलेंज दिले होते ते पण चॅलेंज ते स्विकारु शकत नाही.

आपलं सरकार पाडलं आणि यांचे सरकार बसले. ही गुंतवणुक गेली कुठे ? गुजरातला गेली. आज योगायोगाने सुभाष देसाई माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरु आहे. माझी जखम एकच आहे, माझ्यावर झालेला वार एकच होता आणि मी म्हणजे मी एकटाच नाही या महाराष्ट्रातील तरुणांवर जो वार झाली जखम झाली ती एकच आहे. ती म्हणजे आपल्या राज्यातून जे उद्योगधंदे पळवले. आता आपण हे बोलत असताना गुजरातमध्ये एक कार्यक्रम चालू आहे. गुजरातमध्ये आपल्या राज्यातून एअर बसच्या पळवलेल्या प्रकल्पाचे भूमीपूजन चालू आहे. हे जे वार आपल्यावर झाले आहेत. आता आपण जे बोलतोय ही महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी विचार करावा जर आपले सरकार असते तर वेदांत, फॉक्सकॉन, एअर बसचा प्लान्ट आपण आपल्याच राज्यात आणला असता. पण एकनाथ शिंदेंनी गुजरातला पाठवल्यानंतर आज गुजरात मध्ये आता एअर बस प्लान्टचे भूमीपूजन सुरु आहे. या कार्यक्रमासाठी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष आले आहेत. आपले पंतप्रधान तेथे आहेत. पण भाजपला जो भाजप महाराष्ट्र द्वेष घेऊन चालतो तो आज महाराष्ट्राचा द्वेषाचा साजरा सण करत आहे,याचा विचार करण्याची गरज आहे.

याच रायगडमध्ये, रोह्यामध्य़े आपण मेडिकल डिवाईस पार्क जसे ऑरेंज सिटीत आणणार होतो. बल्क ट्रंक बार इथे आणणार होतो. 75 हजार नोकऱ्या आपण इथे निर्माण करु शकलो असतो. मेडिकल डिवाईस पार्कमध्ये पुन्हा एकदा 75 हजार नोकऱ्या निर्माण करु शकलो असतो. पण या सगळ्या रोजगाराच्या संध्या त्यांनी उचलल्या आणि गुजरातला पाठवल्या. गुजरातशी माझा वैयक्तिक वाद नाही. हा वाद फक्त महाराष्ट्र विरोधात गुजरात नाही तर झारखंड विरोधात गुजरात, उत्तरप्रदेश विरुद्ध गुजरात असा लावण्यात येत आहे. झारखंडच्या इंडस्ट्रीज देखिल भाजपाने उचलल्या आणि गुजरातला नेल्या आहेत. तिथे देखिल तरुणांनी मला प्रश्न विचारला की आदित्यजी असे का? असे आमच्या झारखंड़मध्ये उद्योग येत नाहीत पण गुजरातमध्ये जातात. जेव्हा उत्तर प्रदेशात आशिर्वाद घ्यायला जातो तेव्हा मंदिरात गेल्यावर पुजाऱ्यांनी विचारले आमच्या इकडचे कॉन्ट्रॅक्ट आहे ते गुजरातला मिळते. पुजारी बदलून गुजरातचे येणार. हा वाद थांबला पाहिजे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.