Jammu Kashmir – जम्मू-काश्मीरमधील दाचीग्राममध्ये चकमक, लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंधित एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील दाचीग्राम भागात मंगळवारी ही चकमक झाली. जुनैद अहमद भट असे ठार झालेल्या स्थानिक लष्कर कमांडरचे नाव आहे.

जुनैदचा गगनगीर, गंदरबल आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांदरम्यान नागरिकांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचे काश्मीर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ पथकाने परिसरात शोध मोहिम सुरु केली. या मोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. या चकमकीत जुनैद भट याला सुरक्षा दलाने कंठस्नान घातले.