
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना आरोग्याशी निगडीत समस्यांचा त्रास जाणवत आहे. तसेच त्यांना दोन दिवसांपूर्वीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असल्याचे वृत्त आहे. सध्या आडवाणी यांना न्यूरोलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. विनित सुरी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 97 वर्षीय आडवाणी यांना ऑगस्ट 2024 मध्येदेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.