टोरेस आर्थिक फसवणूक – तौसीफ रियाजचा थांगपत्ता लागेना, कुठे दिसल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील पसार मुख्य आरोपींपैकी एक असलेला तौसीफ रियाज ऊर्फ जॉन कारटर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी तौसीफ सापडणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस त्याचा कसून शोध घेत असून तो कुठे दिल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणात हजारो गुंतवणूकदारांचे पैसे गेले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी सर्वेश सुर्वे, व्हॅलेंटिना आणि तानिया असे तिघांना पकडले होते. मात्र या गुह्यातील मुख्य आरोपी पसार होण्यात यशस्वी ठरले. त्यात आठ युव्रेनचे, एक तक्रिश आणि मुंबईत राहणाऱया तौसीफ रियाज ऊर्फ जॉन कारटर याचा समावेश आहे. या टोरेस फसवणूक प्रकरणात तौसीफने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो लवकरात लवकर हाती लागणे गरजेचे आहे. पण काही केल्या तौसीफ सापडत नसल्याने तपास पथकाची गोची झाली आहे. त्याचे लोकेशन बिहारमध्ये सापडले होते. पण तेथूनही तो सटकला आहे. त्यामुळे तौसीफची माहिती कोणाला मिळाल्यास तत्काळ मुं. आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.