रिल्स बघण्यात गुंग डॉक्टरमुळे महिलेचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मैनपुरी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्येच एका 60 वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचार करण्याऐवजी डॉक्टर डय़ुटीवर असताना रील पाहत होते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवेश कुमारी (60) या महिलेला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात आणले होते. यावेळी डॉक्टर आदर्श संगर यांनी रुग्णाला तपासण्याची जबाबदारी नर्स आणि पंपाउंडरवर सोपवली.