
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप गुलदस्त्यात असून शपथविधी कधी होणार याबाबतही अद्याप निश्चिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अतिशी यांचा राजीनामा
दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सातवी विधानसभा बरखास्त केली. अतिशी मार्लेना या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या. परंतु, पक्षाकडे बहुमत नसल्याने अतिशी यांनी आज नायब राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.