महादेव मुंडे हत्या प्रकरणात शंभर टक्के आकाचा हात, सुरेश धस यांचा आरोप

बीडमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या घटनेत शंभर टक्के आकाचा संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ज्यांनी महादेव मुंडे यांना मारले ते गुंड आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरत होते. आता ते बॉडीगार्ड अचानक पुठे गेलेत? आकाच्या मुलाच्या अवतीभोवती ते नाहीत. तेच पकडले गेले पाहिजेत, असे सुरेश धस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला बसल्या आहेत ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्या माऊलीला उपोषणाला बसायची वेळ यायला नको होती. महादेव मुंडे यांच्या हत्येला आता 15 महिने झाले आहेत. त्यांचे मारेकरी सापडलेच पाहिजेत. ज्या दिवसापासून डीवायएसपींना तपास दिलाय तेव्हापासून 12 ते 15 लोक परळीतून बेपत्ता आहेत. एसपींनी, डीवायएसपींनी त्यांना पकडून आणावे आणि जेलमध्ये टाकावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

महादेव मुंडे यांच्या प्रकरणात मी आरोपींच्या नावाची यादी दिलेली आहे. याबाबत एसपींना डिटेल पत्र दिलेले आहे. काय काय झाले आहे, पुणापुणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, पुणाचे सीडीआर चेक केले पाहिजेत याचे पत्र एसपी नवनीत कॉवत यांना दिले असल्याचे धस म्हणाले.

परळी मतदारसंघात निवडणुकीदरम्यान माधव जाधव यांना मारहाण झाली. त्याचे व्हिडीओ हे त्याच दिवशी व्हायरल झाले होते. तत्कालीन एसपींनी आणि कलेक्टरांनी लगेच आरोपींवर गुन्हा दाखल करायला हवा होता, पण गुन्हा दाखल होण्यासाठी 82 वा दिवस उजाडला आहे. यावरून आपण ओळखून घ्या, परळीत कशा प्रकारे मतदान पार पडले असेल. अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 330 पैकी 200 बुथ अक्षरशः ताब्यात होते हे यावरून सिद्ध होत असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला.