
प्रबोधन गोरेगाव आणि फन लीडर्स फाऊंडेशन आयोजित यांच्या सहकार्याने दहाव्या ‘महाराष्ट्राचा महावक्ता 2025’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 आणि 16 फेब्रुवारी ही स्पर्धा प्रबोधन क्रीडा भवन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प.) येथे घेण्यात येणार आहे.
‘महाराष्ट्राचा महावक्ता’’ ही राज्यातील सर्वात मोठी खुली वक्तृत्व स्पर्धा आहे. ही स्पर्धा राज्यामध्ये अनेक तेजस्वी वक्ते घडवण्याचे कार्य गेली दहा वर्षे करतेय. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला वयाचे बंधन नाही. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये आणि तीन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रुपयांचे असणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल. 16 फेब्रुवारीला शिवसेना नेते, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. तसेच आयपीएस अधिकारी व रेल्वेचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बर उपस्थित राहतील. ही स्पर्धा निःशुल्क असून अधिक माहितीसाठी विशाल उशिरे 7709800595, पंकज दळवी 9619367772 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त इच्छुकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन गोरेगाव फन लीडर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज दळवी आणि प्रबोधन गोरेगावचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी केले आहे.


























































