
‘पर्यटक देवो भवः’ असे ब्रीदवाक्य घेऊन या सुरू झालेल्या आणि मराठी माणसाला पर्याटनाची गोडी लावणाऱ्या केसरी टूर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि पर्यटन क्षेत्राचे अध्वर्यू राष्ट्रपती पुरस्कार विजेते केसरी पाटील तथा भाऊ यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पर्यटन क्षेत्राचे मोठी हानी झाली आहे.
केसरी पाटील यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगी वीणा पाटील तसेच झेलम चौबळ, मुलगा शैलेश आणि हिमांशू, जावई, नातवंडे असा परिवार आहे. केसरी पाटील यांचे पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पर्यटन, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील मंडळींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. केसरी पाटील यांच्यावर दादर येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.