
स्टॉक ट्रेडिंग स्कॅममध्ये दाखवलेल्या 1 हजाराचे गिफ्ट व्हाऊचर्स मिळविण्यासाठी एका महिलेवर तब्बल 51 लाख रुपये गमावण्याची वेळ आली. हरी सिंह नावाच्या एका तरुणाने या महिलेला स्टॉक मार्केटमध्ये 3 ते 5 पट कमाई करण्याचे आमिष दाखवले होते. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी स्कॅमर्सने महिलेला एक हजार रुपयाचे गिफ्ट व्हाऊचरसुद्धा पाठवले. स्कॅमर्सवर विश्वास ठेवून पीडित महिलेने 51.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्या महिलेला व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये जोडण्यात आले, परंतु पैसे पाठवल्यानंतर स्कॅमर्सने सर्व कॉन्टॅक्ट बंद केले. त्यामुळे महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी 4 लाख 80 हजार रुपये गोठवले असून बाकीची रक्कम मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.