शुभमन गिल आयसीसीच्या मासिकवीराच्या शर्यतीत

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चा करंडक उंचावताना हिंदुस्थानी संघाला पाहण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी आसुसलेले असतानाच आयसीसीने आणखी एक ‘गुड न्यूज’ दिली आहे. आयसीसीने फेब्रुवारी 2025 महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठीच्या नामांकनाची घोषणा केली असून हिंदुस्थानचा सलामीवीर शुभमन गिलचाही या शर्यतीत समावेश करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गिल चांगल्या फॉर्मात आहे. गिलला फेब्रुवारीतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मात्र हा पुरस्कार पटकावण्यासाठी गिलला ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडूचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्स यांचा अडसर दूर करावा लागणार असून स्मिथ आणि फिलिप्सचे तगडे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.