
मुंबईसह राज्यभरात सूर्य अक्षरशः आग ओकत असून उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांचा घामटा निघाला आहे. उष्माघातामुळे राज्यात 8 मार्चपर्यंत चार जण बाधित झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात सध्या प्रचंड उष्ण तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. 9 ते 11 मार्चपर्यंत कोकण पट्ट्यासह मुंबई, ठाणे, पालघर जिह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ईशान्येकडील वारे सक्रिय झाल्याने उत्तरेकडून येणाऱ्या शहरात पूर्वेकडील वारे वाहण्यास सुरुवात होणार असल्याने तापमान वाढण्याची शक्यता आहे.
अशी घ्या काळजी…
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी प्या, हलका आहार घ्या, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री, टोपी, पादत्राणे वापरा, फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.



























































