
मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे रुळ आणि सिग्नलची देखभाल दुरुस्तीसाठी ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी दिवसा असणारे सर्व ब्लॉक रद्द करण्यात आले आहेत.
ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व रेल्वे फेऱ्या 20 मिनिटे उशिराने धावणार आहे. सीएसएमटीहून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेसवर याचा परिणाम दिसणार आहे.
हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सीएसएमटी ते पनवेल-बेलापूर आणि पनवेल ते ठाणे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. तर सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
            
		





































    
    






















