Video – ठाकरे बंधुंच्या साद-प्रतिसाद भूमिकेचं महाराष्ट्रातून स्वागत!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत, त्यांच्यात कोणतेही वाद, मतभेद किंवा भांडणे नाहीत. महाराष्ट्राच्या शत्रूंना विरोध ही आमची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी साद घातली आहे. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रहितासाठी ही चांगली गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.