एकनाथ शिंदे करवादले कामाचं बोल रे… राजू पाटील यांनी दिली 13 कामांची यादी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांवर राग व्यक्त करत ‘कामाचे बोला’ अशी प्रतिक्रिया दिली होती. याच मुद्यावरून आता मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या विकासाला शिंदे पिता-पुत्र जबाबदार असून शिंदे यांना राजू पाटील यांनी ‘कामाचे’ 13 प्रश्न विचारले आहेत.

कल्याणच्या विकासावरून यापूर्वीही शिंदे आणि पाटील यांच्यात अनेक वेळा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. याच पाश्र्वभूमीवर पाटील यांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रलंबित प्रश्नांचा पाढा वाचला आहे. त्यांच्या प्रश्नांची यादी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

शिंदेंना कोंडीत पकडणारे हेच ते प्रश्न
कल्याण-तळोजा मेट्रोसाठी भूसंपादन कधी होणार? जर झाले नसेल, तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी सुरू असलेले हे वाहतूककोंडी वाढवणारे काम कधी थांबवणार?
पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामे तोडून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू होणार?
कल्याण-डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला १४० एलएलडी पाण्याचा कोटा परत कधी मिळणार?
पलावा पूल व लोकग्राम पूल कधी पूर्ण होणार?
अनधिकृतपणे सुरू असलेला दिवा डम्पिंग प्रकल्प कधी बंद करणार?
नवी मुंबईत नव्याने समाविष्ट झालेल्या 14 गावांच्या विकासासाठी आवश्यक 5 हजार 900 कोटींचे पॅकेज कधी मंजूर होणार?