धनबादमधून अटक केलेले 4 संशयित निघाले दहशतवादी, स्लीपर सेल तयार करण्याचे काम करत होते

terrorist

धनबादमधील वासेपूर येथून अटक करण्यात आलेले चार संशयित दहशतवादी निघाल्याचे समोर आले आहे. झारखंड एटीएसने या चौघांना अटक केली होती. गुलफाम हसन, अयान जावेद, शाहजाद आणि शबनम परवीन अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांचा हिजबुल मुजाहिद्दीन, अल कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट, आयएसआय आणि इतर बंदी घातलेल्या संघटनांसाठी स्लीपर सेल तयार करण्याचे काम हे दहशतवादी करत होते.

हे सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकावून, त्यांची दिशाभूल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे चारही तरुण संशयित दहशतवादी 30 हून क्मी वयाचे आहेत. तर अयान आणइ शबनम हे संगणक तज्ञ आहेत. त्या दोघांवर स्लीपर सेल्स हाताळण्याची जबाबदारी होती. एटीएसने त्यांच्याकडून पेन ड्राईव्ह, संगणक हार्ड डिस्क आणि मोबाइलसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.