जणू काही तुम्ही वेगळ्याच जगात वावरता, हाय कोर्टाने टोचले बाबा रामदेव यांचे कान

बाबा रामदेव यांनी रुफ अफजाला शरबत जिहाद म्हटलं होतं. यावरून उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांचे कान टोचले आहेत. तसेच कोर्टाने रामदेव यांच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याचीही नोटीस पाठवली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. बाबा रामदेव यांनी रुफ अफजाला शरबत जिहाद म्हटलं होतं. याविरोधात कंपनीने बाबा रामदेव यांच्याविरोधात केस केली होती. कोर्ट म्हणाले की बाबा रामदेव कुणाच्याच नियत्रंणात नाहीत, ते वेगळ्याच दुनियेत वावरतात.

हमदर्द कंपनीने बाबा रामदेव यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेत बाबा रामदेव यांच्या शरबत जिहादच्या विधानाला आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने बाबा रामदेव यांचे कान टोचल्यानंतरही बाबा रामदेव यांनी तसेच व्हिडीओ शेअर केले होते. यापूर्वी बाबा रामदेव यांचे वकील राजीव नायर यांनी बाबा रामदेव यांचे वादग्रस्त व्हिडीओ हटवले जातील असे सांगितले. तसेच कोर्टाने बाबा रामदेव यांना भविष्यात अशी विधानं करणार नाही असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.