‘रेड 2’ ची पहिल्या वीकेंडमध्ये 51.31 कोटी रुपयांची कमाई

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘रेड 2’ ने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमापूळ घालत 51.31 कोटी रुपयांची कमाई केली. रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांची भूमिका असलेला हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला. राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केले आहे. रविवारी पहिल्या वीकेंडमधील चित्रपटाची कमाई जाहीर केली. ‘रेड 2’ हा 2018 च्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यामध्ये अजय देवगण आयआरएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.