
दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी इंडिगोचे विमान शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर आरोपीला पकडण्यात आले. संबंधित प्रवाशाने विमानाच्या शौचालयाजवळ एअर होस्टेसला चुकीचा स्पर्श केला. या प्रकारानंतर एअर होस्टेसने तिच्या क्रू मॅनेजरला घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिर्डी विमानतळावर विमान उतरल्यानंतर आरोपीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.