जेफ बेझोस 40 हजार कोटींचे शेअर्स विकण्याच्या तयारीत

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस त्यांच्या कंपनीतील सुमारे 4.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स अर्थात 40,173 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकण्याच्या तयारीत आहेत. ते तब्बल 2.5 कोटी शेअर्सची विक्री करणार आहेत. यापूर्वी 2024 मध्ये त्यांनी 13.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे शेअर्स विकले होते. आता ते 29 मे 2026 रोजी संपणाऱ्या एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत आणखी शेअर्स विकण्याची योजना आखत आहेत. बेझोस अॅमेझॉनमध्ये एक प्रमुख भागधारक आहेत.