
अमृतसरमधून पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या दोन गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांनी पलक शेर मसीह आणि सूरच मसीह या दोघांना अटक केली. हे दोघे हिंदुस्थानी लष्कर आणि अमृतसर हवाई तळाशी संबंधित माहिती पाकिस्तानला देत होते.
पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांनी अमृतसर तुरुंगात बंद असलेल्या हपप्रीत सिंह ऊर्फ हॅप्पीमार्फत या लोकांशी संपर्क साधल्याची माहिती हाती लागली आहे. दोघेही अमृतसरच्या बलहडवाल येथील रहिवासी आहेत. हे आयएसआय एजंट पह्नद्वारे सैन्याच्या हालचाली, अमृतसर हवाई तळाचे पह्टो आणि व्हिडीओ आयएसआयला पाठवत होते. यासाठी त्यांना सिमकार्ड आणि पह्नही पुरवण्यात आले होते.