
ठाणे येथे दाखल गंभीर गुह्यातील नक्षलवादी आणि मागील 14 ते 15 वर्षांपासून फरार असलेला आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ ‘लॅपटॉप’ याला दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटने अटक केली. कांबळेला चऱ्होली येथून ताब्यात घेतले.
कांबळे यांच्यावर 2011 साली ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. दरम्यानच्या काळात त्याने जवळपास 6 ते 7 वर्षे रायगड जिह्यातील खोपोली येथे स्थानिक आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिकविण्याचे काम केले. आपले खरे अस्तित्व लपवून तो वावरत होता. त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट आणि जाहीरनामादेखील जारी करण्यात आला होते. दरम्यान, दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटने 3 मे रोजी सापळा रचून चऱहोली भागातून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मुंबई सेशन कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्यास 13 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.