उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात आग, भाविकांमध्ये घबराट

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भीषण सोमवारी दुपारी भीषण आग लागली. शंखद्वाराजवळील बॅटरी कार्यालयात ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात आगीचे मोठ मोठे लोट दिसून येत आहेत. सुदैवाने या आगीत एकही भाविक जखमी झाला नाही.