दिल्लीत वाहतूककोंडी; लांबच लांब रांगा

देशातील मुंबई, पुणे आणि दिल्ली यांसारख्या शहरांत वाहतूककोंडी होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूककोंडी पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयात पोहोचण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना ट्रफिक जॅममुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.