एक लाख भाविकांनी घेतले चारधामचे दर्शन

केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे भक्तासाठी उघडण्यात आले आहेत. उत्तराखंडमध्ये 30 एप्रिलपासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेत आतापर्यंत 1 लाख 89 हजार 212 भक्तांनी दर्शन घेतले आहे. केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री आणि बद्रीनाथ या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शन करण्यासाठी भाविक केदारनाथमध्ये सर्वाधिक पोहोचल्याचे दिसत आहे. चारधाम यात्रेत ज्या भाविकांनी दर्शन घेतले आहे, त्यामध्ये केदारनाथ धाम 79,699, यमुनोत्री धाम 48,192, गंगोत्री धाम 37,739, बद्रीनाथ धाम 23,580 भक्तांनी दर्शन केले आहे. चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा तैनात केली आहे.