
पाकिस्तानकडून सलग 12 व्या रात्री नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान कोणते पाऊल उचलणार, प्रतिहल्ला कसा करणार याचा अंदाज पाकिस्तानला येत नसल्यानं ते चांगलेच बिथरले आहेत. त्यामुळेच शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विविध चौक्यांवर गोळीबार करण्यात येत आहे. हिंदुस्थानी लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
05-06 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवरून गोळीबार केला. हिंदुस्थानी सैन्याने चोख पद्धतीने प्रत्युत्तर दिले, अशी माहिती हिंदुस्थानी लष्कराकडून अधिकृतरित्या देण्यात आली आहे.