IPL 2025 – जॅक्सचे अर्धशतक, सूर्याची साथ; पण मधल्या फळीने दगा दिला, मुंबईचे गुजरातपुढे 156 धावांचे आव्हान

विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकीय भागीदारीनंतरही मधल्या दगा दिल्यामुळे मुंबईचा संघ 20 षटकांमध्ये 155 धावांपर्यंतच पोहोचू शकला. मुंबई मे गुजरात टायटन्स पुढे तुझ्यासाठी 156 धावांचे आव्हान ठेवले. विल जॅक्सन 51 धावांची अर्धशतकी खेळी केली तर सूर्यकुमार यादव ने 35 धावा करत त्याला उत्तम साथ दिली. पण गुजरातच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत ठराविक अंतराने विकेट घेतल्याने मुंबईचा डाव गडगडला.


गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईची सलामीची जोडी स्वस्तात बाद करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. मात्र त्यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकीय भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. पहिल्या 10 षटकांमध्ये मुंबईने 89 धावा केल्या होत्या. पण हे दोघे बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला आणि 20 षटकांमध्ये मुंबईला 8 बाद 155 धावाच करता आल्या. गुजरातच्या प्रत्येक गोलंदाजाला किमान एक तरी विकेट मिळाली. साई किशोर याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.