शस्त्र विक्रीसाठी आलेल्यांना अटक

घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या शाकीर समसुद्दिन अली आणि विकास श्रीचंद जाटव यांना मालाड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस जप्त केली. मालाडला काही जण घातक शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सहायक निरीक्षक दीपक रायवाडे आदींच्या पथकाने सोमवारी रात्री सापळा रचून शाकीर आणि विकासला ताब्यात घेतले.