Operation Sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यात बैठक सुरू

nsa ajit doval and pm modi

ऑपरेशन सिंदूरनंतर आता सीमाभागातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासून हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानने पाकड्यांचे सर्व ड्रोन व दोन विमानं पाडली. या सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पतंप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे.