India Pakistan War – युद्ध नको, शांतता हवी! हिंदुस्थानने तांडव सुरू करताच पाकिस्तानची टरकली, उपपंतप्रधानांची भाषा बदलली

हिंदुस्थान आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या संघर्षात पाकिस्तानचे उपपंपतप्रधान आणि  परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान जर थांबणार असेल तर आम्हीही हल्ले थांबवू असे डार म्हणाले. तसेच पाकिस्तानला आणखीन विनाश नकोय असेही डार म्हणाले.

एबीपी न्युजने याबाबत वृत्त दिले आहे. डार हे पाकिस्तानच्या जियो न्युजशी बोलताना म्हणाले की आम्हालाही अजून फार नुकसान नकोय. आम्हाला विनाश नकोय आणि संपत्तीचे वाया घालवयची नाहिये. पाकिस्तानला नेहमची शांतता हवी होती. जर हिंदुस्थान थांबणार असेल तर आम्हीही शांततेचा विचार करू आणि प्रत्युत्तराची कुठलीही कारवाई करणार नाही. वास्तवात आम्हालाही शांतता हवी आहे असेही डार म्हणाले.


पाकिस्तानकडून 26 ठिकाणी हल्ले

शुक्रवारी पाकिस्तानने हिंदुस्थानात 26 ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याला हिंदुस्थानी सैन्याने जोरदार उत्तर दिले. हिंदुस्थानी सैन्याने सांगितले की प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने सीमावर्ती भागातला आपला एअरस्पेस बंद केलेला नाही आणि नागरी विमानांवर त्यांनी बंदी आणलेली नाही.