पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचाच आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या विधानावरून सध्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यावर बोलताना आज तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानचेच असून त्यावर चर्चा होऊ शकत नाही, असे ठणकावले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांनी पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानचेच असून तो आम्हाला मिळालाच पाहिजे, असे ठणकावले आहे.

”मला आशा आहे की आज हिंदुस्थान सरकारने सर्व जगाला हे स्पष्ट केलं असेल की काश्मीर हा कोणत्याही प्रकारच्या चर्चेचा विषय नाही. काश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार. हा आंतरराष्ट्रीय तसेच दोन देशांमधील देखील मुद्दा नाही. फक्त एकच गोष्ट ही दोन देशांमधील आहे ती म्हणजे पाकव्याप्त काश्मीर. पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचाच आहे आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले आहे.