पाकिस्तानात सलग तिसरा भूकंप

ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याने बिथरलेला पाकिस्तान आठवडाभरात तिसऱयांदा भूकंपाने हादरला. या भूकंपात कुठल्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे समजते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र बलुचिस्तानात होते. अफगाणिस्तान सीमेजवळ हे केंद्र असून या भूकेंपाचे धक्के क्वेटा, चमन आणि सीबी या शहरांना बसले. या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी होती. यापूर्वी 5 आणि 10 मे रोजी पाकिस्तानात भूपंपाचे धक्के बसले. यांचे केंद्रही बलुचिस्तानात होते. एकीकडून बलुची आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले तर दुसरीकडून हिंदुस्थानी लष्कराकडून त्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता भूकंपानेही पाकिस्तानला धक्के दिले आहेत.