
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झिरवाळ हे काही दिवसांपासून किडनीच्या विकारामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र पुढील काही दिवस त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.