
नागपूरमधील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवार येथे जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्डय़ात पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील चार जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे हे मृत्यू सामूहिक आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. मृतांमध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन किशोरवयीन बालकांचा समावेश आहे.