अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीचा अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक

अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या गाडीला एका ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातातून लहामटे थोडक्यात बचावले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील विठे घाटात हा अपघात झाला. किरण लहामटे यांच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात लहामटे यांच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.