
प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी सफाई मशीन मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात अचानक रेल्वे रुळावर कोसळली. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल थांबवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे प्लॅटफॉर्म 7 वरील लोकल सेवा काही वेळ थांबवण्यात आली होती. या स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.