परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ, ‘झेड’ श्रेणीच्या सुरक्षा कवचात बुलेटप्रूफ कारचा समावेश

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जयशंकर यांच्या ताफ्यात एका विशेष बुलेटप्रूफ कारचा समावेश केला आहे. तसेच त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

एस जयशंकर यांना आधीपासूनच झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफद्वारे ही सुरक्षा प्रदान केली जाते. जयशंकर यांच्या सुरक्षेसाठी 33 कमांडोंची एक टीम 24 तास तैनात असते. आता त्यांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ कारचाही समावेश करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला दिलेला करारा जवाब या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

सुरक्षेचा हा दुसरा स्तर असून 22 कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच झेड श्रेणीद्वारे प्रदान केले जाते. यामध्ये चार ते पाच एनएसजी कमांडो घातक शस्त्रास्त्रांसह घेरा बनवून असतात. यात काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असतो. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी सुद्धा या सुरक्षा व्यवस्थेत असतात.

कश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही! युद्धविरामाच्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला

भाजपच्या 25 नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा

दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठख घेतली. या बैठकीमध्ये व्हिआयपी नेत्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. पाकिस्तानसोबत तणावाची स्थितीत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, विदेश सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह जवळपास 25 भाजप नेत्यांच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जाणार आहे. आगामी काळात त्यांच्याही सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Operation Sindoor – पाकिस्तानच्या उद्ध्वस्त झालेल्या एअरबेसचे सॅटेलाईट फोटो आले समोर; धावपट्टी, इमारती बेचिराख