‘नाबार्ड’मध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात

नाबार्डमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक पी. दिनेश यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पी. दिनेश, समितीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर संकपाळ यांची भाषणे झाली. समितीचे सचिव मंगेश परब यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी नाबार्ड ऑफिसर असोसिशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश नायर, नाबार्ड स्पोर्ट्स क्लबचे सरचिटणीस अतुल वेदपाठक , नाबार्ड क्रेडिट सोसायटीचे सचिव राजेश, नाबार्ड एम्प्लॉईज युनियनचे सचिव संजय कदम, नाबार्ड कर्मचारीचे सरचिटणीस दिगंबर वराडकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाबार्ड स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष कृष्णा घाटकर, दिगंबर वराडकर, संदेश जाधव, किरण राऊत, पी. के. निगुडकर, कृष्णा काणेकर, प्रदीप शिंदे, विलास दळवी, बाबा कांदळकर, प्रमोद कदम, बाळकृष्ण गुरव, बी. के. धनन, स्वाती रणदिवे, गीता आचार्या, जितेंद्र खैरनार, जयप्रकाश हळदणकर यांनी अथक प्रयत्न केले.