
तेलंगणामध्ये मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा सुरू आहे, परंतु तेलंगणामधील स्थानिक महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. हे कृत्य अपमानास्पद मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या 72 वा आवृत्तीचा समारोप 31 मे रोजी होणार आहे. या वेळी काही स्पर्धक तेलंगणातील मुलुगु जिह्यातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या 800 वर्षे जुन्या रामप्पा मंदिराच्या सांस्कृतिक सहलीला गेले होते. त्या वेळी महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुतले, परंतु हा व्हिडीओ आता समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.