मस्करी जीवावर बेतली…गुप्तांगात पाण्याचा पाईप घातला अन् उच्च दाबाने पाणी सोडले, तरुणाचा मृत्यू

हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे चार मित्रांनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केली. दरम्यान पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मस्करीतून घडली आहे किंवा एखाद्या भाडंणातून मित्रांनी युवकाची हत्या केली, याचा पोलीस शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज चौहान असे या मृत तरुणाचे नाव असून तो संजय कॉलोनीतील रहिवाशी होता. तर अतिंदर, कार्तिक, संदीप आणि राहुल असे त्याच्या आरोपी मित्रांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी रात्री मनोज आणि त्यांचे चार मित्र एका समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वजण आंघोळीसाठी एका फार्महाऊसवर गेले. यावेळीच मनोजच्या मित्रांनी हे क्रूर कृत्य केले.

मनोज आणि त्याचे चारही मित्र स्विमींग पूलमध्ये अंघोळ करत होते. यावेळी मनोजचा मित्र संदीपने त्याला मागून पकडले. यानंतर राहुलने चालू असलेल्या सबमर्सिबलमधून पाण्याचा पाईप काढून मनोजच्या गुप्तांगात घातला आणि आत उच्च दाबाचे पाणी सोडले. ज्यामुळे त्याला अंतर्गत दुखापत झाली. त्यामुळे मनोजची तब्येत बिघडली. हे पाहून त्याच्या सर्व मित्रांनी मनोजला त्याच्या घरी सोडले. मनोज बेशुद्ध अवस्तेत घरी परत्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी मित्रांना विचारणा केली. यावेळी मनोजने लग्नात जास्त दारू प्यायल्यामुळे त्याला हा त्रास झाल्याचे त्याच्या मित्रांनी कुटुंबीयांना सांगितले.

दरम्यान काही वेळाने मनोजला शुद्ध आली आणि त्याने त्याचा भाऊ आनंदला घडलेला प्रकार सांगितला. ही घटना समजताच मनोजच्या कुटुंबीयांनी त्याला बल्लभगड येथील सरकारी रुग्णालयात नेले. यावेळी उपचारादरम्यान मनोजचा मृत्यू झाला. त्यामुळे मनोजच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. मनोजच्या भावाने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संदीप आणि राहुल या दोन आरोपींना अटक केली आहे, तर इतर दोन आरोपी अतिंदर आणि कार्तिक फरार आहेत. फरार आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.