
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. नारळीकरांनी सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे कार्यही अविरतपणे केले. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्यांपर्यंत सोप्या आणि सहज भाषेत त्यांनी विज्ञान पोहचवले.