
अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासह पश्चिम उपनगरवासीयांना वाहतुकीला दिलासा देणाऱया गोखले पुलावरून शुक्रवार, 23 मेपासून बेस्ट सेवा सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला पुलावरून ए 359, ए 422 आणि 424 या क्रमांकाच्या बस धावणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे.
गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नोव्हेंबर 2022 मध्ये हा पूल वाहतुकीला पूर्णपणे बंद करण्यात आला होता. सुमारे अडीच वर्षांनंतर हा पूल पूर्ण क्षमतेने खुला करण्यात आला आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गांनी वळवण्यात आली होती तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते. मात्र, पूल खुला केल्यानंतरही त्यावरून बेस्ट वाहतूक सुरू करण्यात आलेली नव्हती. मात्र आता वाहतूक सुरू होईल.