
ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवताय. दहशतवादाला खतपाणी घालणाऱया पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघडा पाडणार आहात. परंतु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाटच आहेत, त्यांना आधी पकडा, अशा शब्दांत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पाकिस्तानला ऑक्सिजन चीनने दिला. चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकत नाही. अन्यथा आपल्याला आणखी मोठे यश मिळाले असते. परंतु, चीन आणि पाकिस्तानची जोडगोळी आड आली. पाकिस्तानवर आम्ही सवाल उपस्थित केले आहेत, असे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले. राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत आहेत अशी टीका भाजपने केली होती. त्याला जयराम रमेश यांनी सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले पाकिस्तानला क्लीन चिट पुणी दिली, जीनांना क्लीन चीट पुणी दिली? लालपृष्ण अडवाणी यांनी दिली. जीनांची स्तुती पुणी केली जसवंत सिंह यांनी केली. जीना महान नेते होते, असे जसवंत सिंह म्हणाले. लाहोर बससेवा अटल बिहारी वाजपेयींनी सुरू केली. नवाज शरीफ यांच्याकडे ब्रेकफास्टला नरेंद्र मोदी गेले होते. आंबे, शाल मोदींनी पाठवली होती, अशा शब्दांत जयराम रमेश यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.