
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला. जर का कोणाच्या मनामध्ये आपले लचके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणात कसे तुकडे करायचे ते आपण सगळे एकत्र मिळून ठरवू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की, मी काहीतरी पराक्रम केला. पराक्रम मी नाही केला, पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने केलेला आहे. शिवसेनेची स्थापनाच मुळामध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्याला तोडून मोडून टाकणं या करता आहे. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. आकाशामध्ये घारी असतात तशी गिधाडं पण असतात. मला चिंता नेहमी आपल्यासोबत असलेल्या कामगारांचे रक्षण करण्याची असते, ती या गिधाडांपासून असते. कारण एकदा का एकजूट तुटली की तर लचके तोडायला आपले शत्रू मोकळे असतात, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा, संजय राऊत यांचा आरोप
शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती शिवसेनेवरती भरोसा ठेवलेला आहे. आणि हा विश्वासघात आमच्याकडून कदापि होणं शक्य नाही. नुतसं शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरेंचा विजय असो… आणि तसा विजय मला नकोय. मला तुमच्या हृदयातून आलेली एक भावना पाहिजे. हृदयातनं आली पाहिजे. जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे? हातामध्ये जो भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
या सगळ्या कंपन्या येत असतात, जात असतात. आपण कोण आणणारे ही कंपनी. आताही ती सेलेबी कंपनी होती, ती आपलं थोडीच कोण लागते? आता तिला बंदी घातल्यावर कळलं की ती तुर्कीची कंपनी होती. आता नवीन कंपनी कुठलीही आली असेल करार कोण करतं त्यांच्याशी? आणण्याची परवानगी कोण देतं? इकडे काही होर्डिंग लागले की आम्ही म्हणजे त्या लोकांनी आक्षेप घेतला. तुम्ही आक्षेप घेतला, त्या कंपनीचं काम तुम्ही बंद केलं. अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्या देशाच्याविरुद्ध जो कोणी असेल त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे. देशाच्या शत्रूकडून आम्हाला काही नकोच आहे. पण आणणारी तुमचीच लोकं होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
देशाच्या सुरक्षेवर शिवसेना कधीच राजकारण करणार नाही – आदित्य ठाकरे
केंद्र सरकार कोणाचं आहे? एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे? एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट कोणाकडे आहे? तुमचेच सगळे बगलबच्चे आणि मित्र तेच या कंपन्यांसोबत करार करतात. आम्ही आमच्या लोकांना रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो. ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे, कदाचित मला भीती हीच वाटत होती की याचे निमित्त करून कंपनीला तोडायचं, कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तिकडे आणून तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरी लोकं तिकडे भरायची. आता या डावपेचापासून यावेळेला आपण चांगला सामना करून त्यांना उत्तर दिलेलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्हा सर्वांना एकच हात जोडून विनंती करेन की, या विजयावरती म्हणा किंवा विजय म्हणण्यापेक्षा आपण संकट जे परतवून लावलं त्याच्यावरती नुसता भरोसा ठेवून राहू नका. उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद सावंत आहेत, सर्वपदाधिकारी आहेत, युनिट अध्यक्ष आहेत. ताबडतोबीने मला कळवा, यांना कळवा. आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लचके तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे करायचे ते आपण सगळे एकत्र मिळून ठरवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरे सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा
मला कल्पना आहे ही कामकाजाची तुमची वेळ थोडीशी पुढेमागे होतेय. जास्त काही बोलत नाही. तुम्हाला सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो. तुमच्या एकजुटीबद्दल तुमचं कौतुक करतो. आणि असेच एकजुटीने एकत्र राहा, शिवसेना तुमच्या पाठिशी आहे, तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना दिला.