जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या विरोधात CBI चे आरोपपत्र दाखल

जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या बेधडक विधानांनी कायम चर्चेत असतात. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्यावरून त्यांनी केंद्र सरकार निष्काळजीपणाचा आरोप केला होता. याच सत्यपाल मलिक यांच्या विरोधात आता सीबीआयने एका कथित भ्रष्टाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.

कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सीबीआयने यापूर्वी सत्यपाल मलिक यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले होते. विशेष म्हणजे सत्यपाल मलिक यांनीच जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. त्याची चौकशी 2022 मध्ये सुरू झाली.

सत्यपाल मलिक रुग्णालयात

प्रकृती बिघडल्याने सत्यपाल मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः ट्विट करून सत्यपाल मलिक यांनी ही माहिती दिली आहे. हितचिंतकांना नमस्कार. मी फोन कॉल घेण्यास असमर्थ आहे. प्रकृती बिघडल्याने मला रुग्णालयात दाखल करण्या आले आहे. त्यामुळे कोणाशी बोलण्याच्या स्थितीत नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली.