कर्ज वसुलीत चीन ठरला अव्वल देश

चीनचे एकूण 42 देशांवर कर्ज असून कर्ज वसूल करण्यामध्ये चीन अव्वल देश ठरला आहे. 2025 या वर्षाअखेर चीन जगातील विकसनशील देशांकडून 3 लाख कोटी रुपये वसूल करणार आहे, तर 75 गरीब देशांकडून 1.9 लाख कोटी रुपये वसूल करणार आहे. विकसनशील देशांवर चीनचे एकूण 94 लाख कोटी कर्ज आहे. चीन जागतिक बँक आणि आयएमएफला मागे टाकत जगातील सर्वात मोठा कर्जदाता बनला. सरकारी कर्जापैकी 80 टक्के विकसनशील राष्ट्रांकडे गेले. 55 टक्के कर्ज परतफेडीच्या टप्प्यात आहे.