PKL season 12 – 10 खेळाडू करोडपती, ‘अ’ श्रेणीत शादलुई, दलालला 2 कोटींची बोली, तर ‘ड’ श्रेणीत मोहनने खाल्ला भाव

प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामासाठी नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. नव्या हंगामात तब्बल 10 खेळाडू करोडपती झाले आहे. दोनवेळा विजेतेपदावर नाव कोरलेल्या इराणच्या मोहम्मदरेझा शादलुई याला गुजरात जाएंटस संघाने तब्बल 2.23 कोटी रुपयांना खरेदी केली. शादलुईपाठोपाठी गेल्या हंगमात सर्वोत्कृष्ट चढाईपटू ठरलेला देवांक दलाल याच्यासाठी बंगाल वॉरियर्सने 2.20 कोटी रुपयाची बोली लावली.

लिलावाच्या क श्रेणीत अष्टपैलू खेळाडूंची चमक राहिली. नितीन रावल, गुरदीप, धीरज या खेळाडूंना सर्वात जास्त बोली लागल्या. नितीनसाठी जयपूर पिंक पॅंथर्सने 50 लाख, गुरदीपला पुणेरी पलटणने 47.10 लाख, बंगळुरु बुल्सने धीरजला 40.20 लाख तर  आकाश शिंदेला बंगळुरु बुल्सने 53.10 लाख रुपयांना खरेदी केले. तसेच

खेळाडूंच्या लिलावात ड गटात यु मुम्बाने अनिल मोहनसाठी 78 लाख रुपयाची बोली लावली. लीगच्या इतिहासातील या श्रेणीत आजपर्यंत लागलेली ही सर्वाधिक बोली ठरली.