
बदल होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांच्या मदतीला ड्रोन देण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रोन खरेदीसाठी तब्बल 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, शिवाय ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णयही कृषी विभागाने घेतला आहे.
मिनी मंत्रालयातील स्वीय निधीतून ड्रोन खरेदी आणि प्रशिक्षणासाठी तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही त्याचे नियोजन करण्यात आले होते. ड्रोनद्वारे शेतात औषध फवारणी व अन्य कामे करता येणार आहेत. ते चालविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना घ्यावे लागेल. प्रत्येक शेतकऱ्याला 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच दोन अश्वशक्तीच्या कडबाकुट्टी मशिनसाठी 10 हजार रुपये किंवा किमतीच्या 50 टक्के अनुदान मिळेल. पाईप संचासाठी प्रतिमीटर 35 रुपये किंवा 10 हजार रुपये मिळतील. सेंद्रिय शेती विकास प्रकल्पासाठी निविष्ठा व यंत्रसामुग्री, सेंद्रिय शेती प्रमाणिकरण यासाठी 10 हजार रुपये किंवा किमतीच्या 50 टक्के अनुदान दिले जाते. कागदपत्रे जोडून 27 जूनपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी केले आहे.